आ. चंद्रदीप नरके यांनी केले गायरान जमीनसंदर्भात ताबडतोब बैठकीचे आयोजन!

कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील गायरान जमिनीवर वनविभागाचे आरक्षण अधिग्रहित झाले आहे. यासंदर्भात सांगरुळ येथील ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी या विषयी चर्चा केली आणि त्यांचे निवेदन आ. नरके यांनी स्वीकारले.

 

गायरान जमीन हे गावाचे उपजीविकेचे साधन आहे त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्वरित कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला आणि शनिवार दिनांक 15 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी,पालकमंत्री, वनविभागाचे आणि महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही यावेळी सांगरुळ ग्रामस्थांना दिली.