कोल्हापूर: आमदार राहुल आवाडे यांची तळंदगे, हुपरी आणि पट्टणकोडोली येथील शेतकऱ्यांसोबत तसेच डाव्या कालव्याच्या लाभार्थ्यांसोबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना, हुपरी येथे संपन्न झाली.
या बैठकीत आ. आवाडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कालव्याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
यावेळी संबंधित गावांचे प्रतिनिधी तसेच कालव्याचे बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.