कुंभोज (विनोद शिंगे)
संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे (ता. हातकणंगले ) येथे अश्वमेध सोशल अँन्ड एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्य व जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार 2025 यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता या राजमाता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प कोल्हापूर सौ. डॉ. मीना शेंडकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राण्त सागर बगाडे सर, शिक्षण समिती जिल्हाध्यक्ष कोल्हापूर प्रमोदजी तौदकर गट शिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी, संस्थापक अध्यक्ष विनायक मगदूम, चेअरमन शिक्षण बँक कोल्हापूर बजरंग काळे, प्रसिद्धी अभिनेत्री लेखिका अंजली अत्रे , सुरेश पाटील, वर्षा केनवडे, विराट गिरी सर,सुरेखा कुंभार यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.