कोल्हापूर : सीए. अमित शहा, दर्शना शहा, रवींद्र शिंदे यांच्या व्हिजन मनी मंत्रा प्रा. लि. या कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ट्युलिप हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. कविता शहा यांच्या समवेत प्रमुख उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन केले.
काटकसर हा स्त्रियांचा स्थायीभाव आहे. त्यातूनच योग्य बचत आणि गुंतवणूक करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी महिला थोडीफार तरी बचत करतात ही बचत कुटुंबासाठी उपयुक्त ठरतेच पण आता योग्य आर्थिक गुंतवणुकीबद्दल सुद्धा महिलांनी जागरूक असाव. असे आवाहन यावेळी अरुंधती महाडिक यांनी उपस्थित महिलांना केले.
तसेच भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या काही महिलांचा आणि विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला.
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता येण्यासाठी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी व्हिजन मनी मंत्रा प्रा. लि. कंपनी कार्यरत आहे. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता यावी आणि गुंतवणुकी बाबत जनजागृती व्हावी यासाठी सुरू असलेले त्यांचे कार्य हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ. कविता शहा, मा. दर्शना शहा, मा. अमित शहा, मा. तिरुपती शहा, मा. रवींद्र शिंदे यांच्यासह इतर मान्यवर, सत्कारमूर्ती महिला आणि नागरिक उपस्थित होते.