एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे “जागतिक महिला दिन” हा कार्यक्रम अतिशय उत्साहात 

बाहुबली : एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी मंगलाचरण सादर केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.

ज्येष्ठ अध्यापिका सुजाता पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविका मध्ये जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, तसेच स्त्रियांनी स्वतःचे अस्तित्व स्वतः विकसित करणे गरजेचे आहे असे सांगितले.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार ज्येष्ठ महिला अध्यापिकांनी केला.
अध्यापिका मनोगतामध्ये अश्विनी पाटील यांनी महिला दिनानिमित्त भारतातील स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रियांची माहिती दिली.यामध्ये राणी दुर्गावती, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व अरुणा हसफली या शूरवीर महिलांनी कशापद्धतीने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले यांची माहिती थोडक्यात सांगितली.
विविध वेशभूषेमध्ये आलेल्या विद्यार्थिनींनी आपले मनोगत सादर केले यामध्ये प्रांजल खोत हिने अबक्का छोटा देवी, आर्या कांबळे हिने रमाबाई रानडे, अनुष्का उपाध्ये हिने सावित्रीबाई फुले,अक्षरा कांबळे हिने कित्तूर राणी चन्नम्मा तर श्रुतिका पाटील हिने झाशीची राणी या वेशभूषेत येऊन आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर प्रशालेतील सर्व महिला अध्यापिकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते झाला.
अध्यापिका ज्योती यलगुद्रे यांनी उज्वल भवितव्य घडवणाऱ्या महिलांच्यासाठी एक गीत सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी महिला आपल्या कुटुंबातील नाती जोडण्याचे काम करतात तसेच महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजातही मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच आज आपली संस्कृती आणि परंपरा टिकून आहेत.महिलांना समान अधिकार मिळवून देणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले हे उपस्थित होते. तसेच सर्व अध्यापक-अध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार वैशाली पाटील व सूत्रसंचालन जिनमती नांदणे यांनी केले.

🤙 9921334545