कोल्हापूर : शाहू पुतळा, इचलकरंजी येथील न्यू बास्केटबॉल असोसिएशन ग्राउंडला आमदार राहुल आवाडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, ग्राउंडवरील आवश्यक सुविधा आणि सुधारणा यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
यावेळी बास्केटबॉल असोसिएशनचे राजेश तिवारी, सचिन देवरुखकर, खलील महेंद्रगी यांच्यासह संतोष पाटील, ऋषिकेश कुडाळकर, सागर चौगुले, आकाश चव्हाण, संदीप जासूद, अभय जयप्पा, किरण कोष्टी, अमोल उरुणकर, निलेश रावळ, अप्पा कुचेकर, सुहास कसलकर, अमित यादव, प्रशांत पाटील, सतीश बाबर, अरुण शर्मा, सुयश थोरात तसेच ग्राउंडवरील सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान खेळाडूंच्या समस्या ऐकून घेतल्या आणि आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.