कुंभोज (विनोद शिंगे)
हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह शिवसेना पक्षात केलेला प्रवेश नक्कीच पक्षाला ताकद देणारा आहे असे मत पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले ते मुंबई येथे डॉ. मिणचेकर यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलत होते.
सन २००१ पासून शिवसेना पक्षात सक्रिय काम करणारे व हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे दहा वर्ष आमदार म्हणून खंबीर प्रतिनिधित्व करणारे गोकुळचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत हाती शिवधनुष्य घेतले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास असणारे मिणचेकर आज देखील लोकसंपर्काच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत. आज त्यांच्या प्रवेशाने नक्कीच हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मोठी ताकद मिळाली असून पक्ष वाढीसाठी महत्त्वाची ठरणारी आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने, उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे, तालुकाप्रमुख अजित सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. मिणचेकर यांच्यासोबत मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन जाधव, ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख अनिल सुतार, विनोद आप्पा पाटील, अरविंद खोत, शहर प्रमुख धोंडीराम कोरवी, शाखाप्रमुख अविनाश शिंदे, स्वप्निल भंडारी, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत कोळी, युवासेना उपजिल्हाधिकारी अनिल माने, हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, शहर प्रमुख अनिकेत माने, उपशहर प्रमुख सुनील माने, उपशहर प्रमुख अंकुश माने, मिणचे उपसरपंच अजय कांबळे, आळते माजी सरपंच संजय दीक्षित, मजले माजी सरपंच विनायक कोठावळे, नेज माजी सरपंच मनोज कांबळे, भेंडवडे चे माजी उपसरपंच महावीर कांबळे, रुकडी ग्रामपंचायत सदस्य पप्पू कांबळे, चोकाक माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश चोकाककर, मुडशिंगीचे उद्योगपती संदीप कांबळे, जांभळीचे उपसरपंच राम कांबळे सुहास कांबळे, साकेत देशमुख, विवेक नागावकर, यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.