नवे पारगाव येथील शिवछत्रपतींची जगातील विश्वविक्रमी रांगोळीची इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद

कुंभोज  (विनोद शिंगे)
नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी स्कूल (सैनिक शाळा) येथे दि.१२ जानेवारी २०२५ रोजी शिवछत्रपतींची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीची इंटरनॅशनल बुक ऑफ रिकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी रांगोळी काढलेल्या सर्व टिमचे अभिनंदन करत कौतुक केले.

 

 

 

स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड, महाराष्ट्र व श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुह, वारणानगर यांच्यावतीने दि.१२ जानेवारी २०२५ रोजी शिवछत्रपतींची जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली होती.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे १२६ महिलांनी यामध्ये सहभागी होऊन जगातील सर्वात मोठी विश्वविक्रमी रांगोळी काढली होती.

*यावेळी वारणा सहकारी बँकेचे संचालक डॉ.प्रशांत जमने,स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे,श्रावणी चेतन जाधव,शुभांगी नितीन धुमाळ,माधुरी शक्तीकुमार कुंभार,अमृता विशाल केकरे,संगिता संभाजी मोरे,साधना पांडुरंग घोलप,गीतांजली योगेश शिंदे,पदमजा प्रकाश शिंदे,रेखा प्रकाश बच्चे – पाटील यांच्यासह आदी महिला उपस्थितीत होत्या.

🤙 9921334545