कोल्हापूर : बालिंगा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अतर्गत श्री.छ.राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने कृषी कन्या विद्यार्थिनिना ग्रामिण कृषी जागरुकता आणि आधुनिक तंत्रज्ञान कार्यक्रमा अंतर्गत माती परीक्षण विषयी मा .डॉ .प्रा. ए .बी. जाधव यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी शेतकऱ्यांनी आपले भावी आयुष्य व जीवनमान उंचावण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून व नव नवीन बी बीयाणांचा वापर करून स्पर्धेच्या जगात शेतकर्यांनी प्रगती साधली पाहीजे असे त्यांनी मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमास गावच्या सरपंच राखी भवड व उपसरपंच पौर्णिमा जत्राटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रा. ए.बी.जाधव व कृषी सहाय्यक मुकुंद पाटील यांचे स्वागत केले
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ माळी यांनी ही शेती विषयक मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी बाबासो जांभळे , शंकर ढेगे ,मधुकर हापटे ,अनिल जांभळे , जनार्दन शिंदे , प्रकाश वाडकर , बापुसो निचिते , नामदेव माळी , पोपट माळी , नामदेव मगदूम तसेच मोठ्या संखेने शेतकरी महिला वर्ग उपस्थित होता.यावेळी कृषीकन्या सृष्टी बावके , प्रेरणा भोसले , आकांशा अभिमाने , वैष्णवी चव्हाण , पूर्वा चव्हाण , वैष्णवी भांगे व वैष्णवी आमराळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.