कुंभोज(विनोद शिंगे)
बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १०० फुटी गुफा,१२ ज्योतिर्लिंग दर्शन,११ फुटी धबधबा व शंकराची मुर्ती अशा भव्य व दिव्य पवित्र देखाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू पाटील,बांबवडे माजी सरपंच विष्णू यादव,बोरीवडे माजी सरपंच बाळाराम शिंदे,बांबवडे सरपंच भगतसिंग चौगुले,उपसरपंच सुरेश नारकर,माजी उपसरपंच स्वप्निल पाटील,शाहूवाडी शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप पाटील,इस्लामपूर सेवा केंद्राच्या संचालिका शोभा बहेनजी,संगिता बहेनजी यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
