कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश राज्याच्या नव्या टुरिझम पॉलिसीमध्ये करावा-आ.अमल महाडिक

कुंभोज( विनोद शिंगे)
कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आज.अमल महाडिक यांनी भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा पर्यटन दृष्ट्या समृद्ध आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्षाने पावन झालेले अनेक गड किल्ले आपल्या जिल्ह्यात आहेत. निसर्गसंपदेने नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश राज्याच्या नव्या टुरिझम पॉलिसीमध्ये करावा.

 

आणि विदर्भ मराठवाडा सिंधुदुर्ग नागपूरच्या धरतीवर कोल्हापूरसाठीही टुरिझम पॉलिसी अंतर्गत एफएसआयची अट शिथिल करावी ही प्रमुख मागणी आमदार अमल महाडिक यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीचा सकारात्मकपणे विचार करण्याचा विश्वास नामदार देसाई यांनी दिला.

🤙 8080365706