येत्या काळात सहकार टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : यवलूज (ता. पन्हाळा) येथील श्री विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते तसेच आ. सतेज पाटील आणि राहुल पाटील-सडोलीकर यांच्या उपस्थितीत झाला.

 

 

सहकाराच्या माध्यमातून यवलूज गावाने सर्वांगीण विकास साधला आहे. आपल्या पूर्वजांनी शास्वत विकासासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही हे ओळखले होते. त्यामुळे येत्या काळात सहकार टिकवायची जबाबदारी आपली असणार आहे अशा भावना यावेळी आ. सतेज पाटील यांनी मांडल्या.

यावेळी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, बी.एच. पाटील, जिल्हा बॅंकेच्या संचालिका शृतिका काटकर, बाजार समिती सभापती प्रकाश देसाई, माजी नगरसेवरक मोहन सालपे यांच्यासह संस्थेचे चेअरमन सर्जेराव कोले, व्हाईस चेअरमन नामदेव पाटील, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, संदीप मोरे, कल्पनाताई पाटील, लक्ष्मीताई पाटील, एकनाथ पाटील, श्रीकांत मोरे, सरदार मिसाळ, शशिकांत आडनाइक सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706