कोल्हापूर : चिमगांव ता. कागल येथील ३३ /११ के. व्ही. चिमगांव उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक आंगज होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या देशात सौरउर्जेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सोलर पॅनेलची योजना कार्यान्वित झाली असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. संपूर्ण जगासाठीच ऊर्जेचा सूर्य हा एक फार मोठा आणि चिरंतन खजिना आहे. जगाचे व देशाचे चित्र यामुळे पालटून गेले आहे. सोलर पॅनेलने आपली नवी टेक्नॉलॉजी सिद्ध केली आहे. सरकारने मागेल त्याला सोलर पॅनल देण्याची योजना आणली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असे मुश्रीफ म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दीपक आंगज यांनीही मनोगत व्यक्त केले .
यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दिग्विजय सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे माजी संचालक नारायणराव मुसळे, सर्जेराव अवघडे, रणजीत सूर्यवंशी, नामदेव एकल, उपसरपंच सौ. चौगले, माजी सरपंच तानाजी एकल, राजू आमते, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, भडगावचे सरपंच बी. एम. पाटील, दौलतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल जाधव उपस्थित होते.
स्वागत शरदकुमार संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता श्री. भणगे यांनी केले. आभार शहर अभियंता प्रकाश पाटील यांनी मानले.
थोरले महाराज असते तर……..
या उपकेंद्रास जागा मिळण्यात अडचणी आल्याची माहिती सरपंच दीपक आंगज यांनी भाषणात दिली. त्यांनी ही अडचण याआधीच जर मला सांगितली असती तर मुरगूडमध्ये महाराजांची भरपूर जमीन आहे. आपण मागणी करून त्यांच्याकडून ती घेतली असती. मुरगुडमध्ये अधिपतींची एवढी जमीन असतानाही सब स्टेशनला जागा मिळू शकली नाही, याचे आश्चर्य वाटते. थोरले महाराज असते तर त्यांनी या कामाकरिता कधीच जागा दिली असती.