कोल्हापूर : कळंबा (करवीर) येथील श्री कात्यायनी देवीच्या मंदिरात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या सुरेख पितळी मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. यावेळी कात्यायनी मातेचा जयघोष करण्यात आला.
श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री सद्गुरू आनंदनाथ सांगवडेकर महाराज यांनी ही सुंदर मुर्ती अर्पण केली आहे.
यावेळी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, कळंबा गावच्या सरपंच सुमन विश्वास गुरव, उपसरपंच संदीप पाटील, रोहित जगताप, इंद्रजित जाधव, रोहित मिरजे, पूनम जाधव, विकास बावडेकर, मिना गौड, अशोक बराले, श्रीकांत पाटील, केरबा पाटील, उदय जाधव संजय मर्दाने, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सर्जेराव साळुंखे यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि भाविक मोठ्या उपस्थित होते.