भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केले.भीमा कृषी पशू प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला आहे.आज उपस्थित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी.आमदार महादेवराव महाडिक, खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसमोर शेती शिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही शेतकरी प्रचंड अडचणीत आहे हे आमच्या ध्यानात आहे मात्र आता शेतीमध्ये विकासावर अधिक भर देणे शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. त्यासाठी अशी प्रदर्शने महत्त्वपूर्ण असून नव नवीन तंत्रज्ञान उपयोग करून शेती कशी करावी यावर धोरणे राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले. वातावरणात होणारे बदल यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येतो अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होते त्यावेळी आमचा शेतकरी कसा सुसह्य कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.

ड्रोन आणि रोबोच्या माध्यमातून शेतीचा विस्तार कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतीमध्ये बदल कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आता तर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे रक्कम देण्यासाठी ही महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे त्यासाठी कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना सोबत घेऊन केंद्रीय पातळीवर आम्ही चर्चा करणार आहोत असे आश्वासन कृषीमंत्री कोकाटे यांनी दिले.महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे बरेच सहकारी विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी कृषी प्रदर्शन भरवत असतात या प्रदर्शनासाठी विमा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन कृषी मंत्री यांनी यावेळी दिले आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागतपर बोलताना गेली १७ वर्षापासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन मधून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती पूरक माहिती साधने विक्री व खरेदी करता येत आहेत.प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली असून चार दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहावयास खरेदी करता येते असे सांगितले.सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना पुढे आणल्या जात आहेत याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. किसान क्रेडिट कार्ड आता तीन लाखाहून पाच लाखापर्यंत करण्यात आले आहे किसान योजना आहे १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री अन्नधान्य योजना अंमलात आणली जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे देशातील १४४ करोड लोकांना कसदार धान्य उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना वीज बिले माफ केली आहे सोलर बाबत योजना पुढे आणली आहे असे सांगितले.

ग्रामीण भागामध्ये उत्कृष्टरित्या पशुवैद्यकीय सेवा व लंपी रोगाच्या प्रादुर्भावामध्ये चांगल्या रीतीने सेवा आणि पशुधन दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना भीमा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ.दिपाली चितरंजन भुतकर गणबावले,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक लिंगाप्पा गावडे, डॉ.हनुमंत गुरव, पशुधन पर्यवेक्षक डॉ.आनंदा पाटील, डॉ. निवृत्ती पाटील, डॉ. पल्लवी खोत, डॉ .दिलीप बारड, वर्णउपचारक श्री. संजय पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. ड्रोन दीदी रेश्मा पाटील सीमा पाटील, सन्मान केला गेला.शिवाय कृषी अधिकारी उमेश पाटील यांचाही मानपत्र देऊन शेतकरी,संस्था यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी भीमा कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक,आमदार सुरेश हाळवणकर,माजी आमदार भरमु अण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस,कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप महानगर कोल्हापूर विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा नाथाजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष भाजप राजवर्धन निंबाळकर, भाजप कोल्हापूर महानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ.रूपाराणी निकम, महिला जिल्हाध्यक्ष भाजपा कोल्हापूर पश्चिम प्रा. अनिता चौगुले,सौ. पुष्पा पाटील , उपाध्यक्ष काडाचे राहुल चोरडिया उपस्थित होते.जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.प्रमोद बाबर.आदी उपस्थित होते.आभार भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वजित महाडिक यांनी मानले.

विधायक रेडा आकर्षण पहिल्याच दिवशी पाहण्यासाठी गर्दी

जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.गोलू २ रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचे वजन जवळजवळ दीड टन आहे. हा विधायक १४ फूट लांब आणि साडे साडेपाच फूट उंच आहेत्या रेड्याची किंमत २५ करोड रुपये असून प्रतिदिन २० किलो दूध २० किलो फीड आणि ३० किलो चारा आणि भुसा खातो.त्याचे राहणीमान ऋतुमानानुसार असते गर्मीमध्ये त्याला एसी आणि पंख्याची आवश्यकता असते.त्याच्या अंघोळीसाठी खास स्विमिंग पूल पानिपत येथे बांधण्यात आलेला आहे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न बीज प्रक्रियेतून प्राप्त होते. सर्वांनाच बघण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी मिळते.विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक,मेरठ उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी गोलू टू म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरविलेले आहे. २०१९ मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.असा हा विधायक नावाचा रेडा २०२५ च्या भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.

चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण

चायना येथून आणण्यात आलेला कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचे तीन वर्षाचे सुलतान नावाचे बोकड हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.३० किलो वजनाचे हे बोकड असून त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत.त्याची लांबी ५ फूट,उंची १ फूट ८ इंच,आणि शिंगे १ फूट ४ इंच आहे.

प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात परिपूर्ण प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.

या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल आहेते.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.

 

आज २२ फेब्रुवारी रोजी.दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार, प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा.
दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.आणि अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर. हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.

आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद यांची विक्री झाली .शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे.तसेच विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.आज संभाजी जाधव यांचा हास्य व्याख्यानाचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.