शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची उद्या राज्यव्यापी बैठक 

कोल्हापूर:शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचे, करदात्यांचे, त्याचबरोबर अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.

 

पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याचही वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं. त्यामुळे आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापक बैठकीस कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे. ही राज्यव्यापी बैठक उद्या सकाळी साडेदहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक या ठिकाणी घेण्यात येणार आहे.