शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

कागल:येथे शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे विरेंद्रसिंह घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच त्यांनी उत्सवमुर्तीस विधीवत जलाभिषेकही घातला.

 

 

नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज,निपाणी वेशीतील छत्रपती संभाजी महाराज,बसस्थानकावरील कागलअधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या पुतळ्यास श्री.घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा तसेच शिवगीते गायिली. यावेळी श्रेयादेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित शिवप्रेमींनी रणवाद्यांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवजयंती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष धैर्यशील इंगळे, शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, सतीश पाटील, सचिन मगदूम, सुजाता तोरस्कर, राजेंद्र जाधव, विवेक कुलकर्णी, सुशांत कालेकर, अरुण गुरव, प्रमोद सोनुले,सज्जन पवार, सातापा घाटगे,अजितसिंह घाटगे, संदीप पसारे, उत्तम पाचगावे,हिदायत नायकवडी,नम्रता कुलकर्णी, रेवती बरकाळे, अश्विनी भोसले, हसीना कुडचीकर यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र- कागल येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,राजे विरेंद्रसिंह घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे