कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ मंत्री प्रकाश आबिटकर तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या.
यावेळी आबिटकर म्हणाले, अधिकारी-कर्मचारी हे कार्यालयीन कामात गुंतलेले असतात त्यांना आपल्या दैनंदिन कामातून ताण तणाव कमी होण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये लपलेल्या कलागुणांना अशा या क्रीडा स्पर्धेतून चालना मिळणार आहे.
यावेळी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) मनिषा देसाई-शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.) अरुण जाधव, पाणी व स्वच्छता प्रकल्प संचालक माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..