जयसिंगपूर येथील झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकरांचा सत्कार

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने आ. राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

जयसिंगपूर शहराच्या वसाहतीत झोपडपट्टीधारकांचा मोठा वाटा असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून त्यांना हक्काची घरे नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होत होती.मात्र,अखेर झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लागला आहे.यापुढेही एकाही कुटुंबाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा विश्वास व्यक्त यड्रावकर यांनी केला. झोपडपट्टी नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा राजीव गांधी नगर मधील नागरिकांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

झोपडपट्टी नियमितीकरणाचे काम अत्यंत अवघड होते.सरकारी आरक्षण काढण्यापासून सुरुवात करून नगरपालिकेकडे जागा हस्तांतरित करणे,तेथील रस्ते आणि गटारीसाठी लेआउट तयार करणे, अतिक्रमणधारकांची कागदपत्रे गोळा करणे आणि मग त्याची निर्मिती करणे या संपूर्ण प्रक्रियेला अनेक अडथळे होते.मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या प्रक्रियेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.या कामादरम्यान अनेक गैरसमज पसरवले गेले होते, पण नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वासास पात्र ठरणे हे माझे भाग्य आहे. आता या निर्मितीच्या कामाला गती मिळाली असून उर्वरित झोपडपट्टी धारकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले.

यावेळी सागर माने,माजी नगरसेवक संभाजी मोरे,शिवाजी कुंभार,राहुल बंडगर,मा.नगरसेविका फुलाबाई बेडगे,अजित पाटोळे,ज्योतीराम जाधव,अमर पाटील,गुलाम शेख, इकबाल इनामदार,शिवाजी सावंत,नेताजी सावंत,रतन पडीयार,राजू घाटगे,इकबाल इनामदार,रुस्तम मुजावर,जीवन हेगडे, रघुनाथ देशींगे,चंद्रकांत चव्हान,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.