हेरवाड येथील विरलिंग मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : हेरवाड येथील प्रसिद्ध विरलिंग मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून भरघोस निधी देण्यात येईल,अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. विरलिंग मंदिराचा जीर्णोद्धार व वास्तुशांती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक होऊन विविध धार्मिक विधी पार पडले.

 

आपला धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंदिरांचा जीर्णोद्धार महत्त्वाचा आहे.याआधीही मंदिर सुशोभीकरणासाठी ६ लाखाचा निधी तर हॉल साठी १० लाखाचा निधी देण्यात आला आहे, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरलिंग मंदिराच्या विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगितले.

यावेळी भाजपाचे अरविंद माने,सरपंच रेखा जाधव, उपसरपंच भरत पवार,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एकनाथ पाटील, माजी सभापती सुवर्णा अपराज, सामाजिक कार्यकर्ते बंडू बरगाले, जितेंद्र देसाई,मिनाज जमादार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटीचे सदस्य,अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.