कोल्हापूर : पिंपळगाव (ता. कागल) येथे निखिल तोडकर व राजेंद्र व्हटकर यांनी नव्याने सुरू केलेल्या व्ही.टी. इन्फ्रा हॉट मिक्स प्लॅंटचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी सभापती रमेश तोडकर, नेताजी मोरे, नवल बोते, अशोकराव नवाळे, महेश चौगले, सरपंच शितल नवाळे, विकासराव पाटील, सदाशिव चौगुले, शाहू काटकर, शिवाजी तोडकर, दत्तात्रय पाटील, किसन मेटील, अर्जुन नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
