आ. राहुल आवाडेंच्या हस्ते कोरोची येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह आणि वाचनालयाचे लोकार्पण

कोल्हापूर : कन्या व कुमार विद्या मंदिर, कोरोची येथे माजी गाव कामगार पोलीस पाटील स्वर्गीय दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय विजया कुबेर (इचलकरंजी) यांनी त्यांच्या नावाने भव्य सभागृह आणि तळमजल्यावरील वाचनालय हॉल उभारले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन आ. राहुल आवाडेंच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

 

 

आ. राहुल आवाडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी हे सभागृह व वाचनालय मोलाची भूमिका बजावणार आहे. समाजातील भावी पिढीसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नामुळे ज्ञानार्जनाची नवीन दिशा निर्माण होईल.

स्व. दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेले हे केंद्र विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि शिक्षणासोबतच त्यांच्यात सामाजिक भान आणि नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत करेल. अशा विधायक उपक्रमातून समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीस हातभार लागणार आहे.