जनता सह बँकेच्या ६२ व्या वर्धापनदिन 

कुंभोज  (विनोद शिंगे)
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पूजेस सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे, बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ वैशाली आवाडे, आदित्य आवाडे, दिया आवाडे उपस्थित राहिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी बँकेचे व्हा चेअरमन संजय अगिगोळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौगुले, संचालक सुभाष जाधव, बंडोपंत लाड, महेश सातपुते, बाबुराव पाटील, बाळकृष्ण पोवळे, श्रीशैले कित्तुरे, शैलेश गोरे, रमेश पाटील, बँकेचे सी ई ओ संजय शिरगावे, जनरल मॅनेजर दीपक पाटील,किरण पाटील, शाखाधिकारी लक्ष्मण कोळेकर, राजेंद्र बचाटे, यांच्यासह चिफ मॅनेजर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.