

कार्यक्रमाचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना पालक आणि इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बदलांचा आढावा अभ्यास मार्गदर्शनाच्या पद्धती विद्यार्थ्यांचे नवीन विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करून पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. इन्स्टिट्यूटमध्ये असणाऱ्या भौतिक सुविधा त्याच प्रमाणे आपला पाल्य दैनंदिन उपस्थित आहे किंवा नाही याची वेळोवेळी मेसेज द्वारे मिळणारी माहिती, परीक्षेविषयी मिळणारी माहिती, ग्रुपच्या सहाय्याने मिळणारी माहिती यातून पालकांना आपल्या पाल्यांची प्रगती कशी आहे. याचे पुरेपूर ज्ञान या इन्स्टिट्यूट मध्ये तात्काळ पालकांना मिळते. त्यामुळे आपल्या पाल्यांसाठी पालकाची महत्त्वाची भूमिका बजावतात येते. इन्स्टिट्यूट विषयी पालकाने गौरवोद्गार काढून सर्व शिक्षक व यंत्रणेचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजित शिरोडकर आणि आभार प्राध्यापक रवींद्र धोंगडी यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा कार्यक्रम पार पडला.