राहुल गांधींचा मतदार याद्यामध्ये अनियमितता आढळून आल्याचा दावा ; निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

दिल्ली: आज (दि.7)दिल्ली येथे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादी मध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा केला. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

 

 

या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळून आली आहे महाराष्ट्रात पाच महिन्यात इतके मतदार कसे वाढले असा सवाल ही त्यांनी केला. याच पी हिमाचल प्रदेश मध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच मतदान झाला आहे असे स्पष्ट केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची खासदार संजय राऊत उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतदार याद्या मध्ये अनेक अनियमितता आढळून आले आहेत आम्हाला नाव पत्त्यासह मतदार यादी हवी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोग याद्या का देत नाही असा अहवाल करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे आम्हाला लोकसभा विधानसभा निवडणूक फोटोसह यादी ची मागणी केली.