मुरगुड / प्रतिनिधी
येथील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मुरगूडच्या राणा प्रताप संघाने विजेतेपद पटकावले. अटीतटीच्या अंतिम सामन्यात राणाप्रतापने कुरुंदवाडच्या श्री स्पोर्ट्सला २५ – २१ व २५ – २० अशा गुण फरकाने नमवित विजेतेपदावर नाव कोरले.
विजेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, राजे बॅंकेचे अध्यक्ष एम पी पाटील, व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव बाळासाहेब सुर्यवंशी, अनंत फर्नांडिस, दलितमित्र एकनाथराव देशमुख,चंद्रकांत जाधव,मारुती ऊर्फ बटू जाधव आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशझोतात या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या.
निगवेच्या आदर्श स्पोर्ट्सने चंदगडच्या जी.डी. स्पोर्ट्सला १५ – १३ व १५ – ११ अशा गुणफरकाने नमवित तिसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसे अशी :ओंकार लोकरे ( अंतिम सामना – मॅन ऑफ द मॅच ), गजानन गोधडे ( मॕन ऑफ द सिरीज ),विवेक उर्फ सोन्या चौगले , सर्व राणाप्रताप ( बेस्ट लिफ्टर ), प्रथमेश सरगुले ( कुरुंदवाड – बेस्ट स्मॕशर ) तर जीवन गोधडे ( बेस्ट लिबेरो )
यावेळी अजित गोधडे ,अमर चौगले, विजय गोधडे,सुशांत मांगोरे,सुरेश गोधडे, शशिकांत गोधडे,सदाशिव गोधडे,विशाल भोपळे, युवराज पाटील,राहुल खराडे आदी उपस्थित होते.