कोल्हापूर : एसटी भाडेवाढ आणि प्रिपेड स्मार्ट मीटर हे दोन्ही सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून टाकणाऱ्या गोष्टी असून याचसह नवीन सीमा तपासणी नाक्यावर अनेक धोकादायक अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समरजितसिंह घाटगे यांनी तहसीलदार कार्यालय, कागल एसटी डेपो आणि महावितरणच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी करण्यात आलेल्या या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल.