शरद पवार यांची प्रकृती बिघडली; अजित पवारांनी फोन करून केली प्रकृतीबाबत विचारपूस

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणामध्ये त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले तिथून नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडली.

 

 

यानंतर शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसंच पूर्णपणे बरे वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी. अशी विनंती ही त्यांनी केली.

शरद पवार यांचे पुढील काही दिवसातील नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. खोकल्यामुळे बोलण्यात अडचण होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांनी चार दिवस सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.