जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे आत्मदहनांचे निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे)
जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी 20 हून अधिक नागरिकांनी आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्याची पत्र दिली आहेत. यामुळे पोलिसासह अग्निशमन दलाची तारांबळ उडाली आहे. प्रशासकीय पातळीवर त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

 

परंतू यामध्ये इशारा देणाऱ्यांना न्याय मिळणार की पुन्हा केवळ आश्वासन हे पाहणे आवश्यक आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त नागरिक येत असतात. या कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही काहींची कामे होत नाहीत. वारंवार भेटून, निवेदन देऊन, निदर्शने करूनही प्रशासनाचे मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने यापैकी काहीजण टोकाची भूमिका घेत थेट आत्मदहन करण्याचा निर्धार करतात. प्रशासनाला तशा इशाऱ्याचे पत्रही दिले जाते. वर्षभरात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजीसह अन्य दिवशी विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे 100 हून अधिक जणांनी आत्मदहनाचे इशाऱ्याचे पत्र दिली आहेत. यापैकी काहींची कामे मार्गी लागली आहेत. परंतू काहींची कामे प्रलंबित राहिल्यानी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची समजूत काढून सोडून दिले आहे.