आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविणाऱ्या बंडू कोळी यांचा सत्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविणाऱ्या बंडू कोळी यांचा सत्कार आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. बंडू कोळी यांचे वडील राजू कोळी आणि आई राजश्री कोळी यांची शाहूनगर येथे छोटीशी मेस आहे.त्या माध्यमातून त आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवतात.दिवसभर मेसमध्ये राबणाऱ्या या दाम्पत्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक त्याग केले आहेत.बंडूचे बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण,रोहितचे कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण,आणि दिव्याचे बी.एच.एम.एस.चे शिक्षण त्यांच्या कष्टातून पूर्ण होत आहे.

 

 

राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना बंडू म्हणाले, “माझ्या यशात आई-वडिलांच्या कष्टांची मोठी भूमिका आहे. त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे मी आज येथे पोहोचलो आहे. मला प्राध्यापक म्हणून करिअर करायचे आहे आणि व्हायरॉलॉजी व कॅन्सर विषयावर पीएच.डी. करून स्टार्टअप उभारण्याचा मानस आहे.”

बंडू कोळी यांचे यश त्यांच्या मेहनतीची आणि तळमळीची कहाणी सांगणारे आहे.आई-वडिलांना मेसच्या कामात मदत करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या या प्रेरणादायक प्रवासाने अनेक तरुणांना संघर्षातून उभे राहण्याची शिकवण दिली आहे.
यावेळी “शैक्षणिक क्षेत्रातील संघर्षातून यश मिळवणे हे खूप मोठे कौशल्य आहे. बंडू कोळी यांची जिद्द आणि समर्पण हे आजच्या पिढीने आत्मसात करावे, असे आवाहन केले.