मुंबई : कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ रोजी दिघा-ऐरोली, नवी मुंबई येथे ELDERTH6N 2025 ‘तु चाल पुढे’ या वॉकथॉन (चालण्याच्या स्पर्धा) चे भव्य आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. व्यायाम, आरोग्याविषयी जागृती आणि परस्पर संवाद यांचा सुरेख संगम म्हणजेच हा वॉकथॉन.
विशेष म्हणजे, या वॉकथॉनला भारताचे आदर्श उद्योगपती कै. रतनजी टाटा यांना समर्पित करण्यात आले. त्यांच्या निःस्वार्थ सेवा आणि समाजासाठी केलेल्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश या वॉकथॉनद्वारे दिला गेला. प्रत्येक पाऊल त्यांच्या कार्याला आदरांजली वाहत होते, आणि त्यांचे जीवन हा अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत बनला.
अशा अनोख्या आणि प्रशंसनीय उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सहभागी स्पर्धक व नागरिकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमात विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली, ज्यात पुरुष आणि महिला विभागातील क्रमांकप्राप्त विजेते तसेच उत्तेजनार्थ विजेते यांचा समावेश होता:
प्रथम क्रमांक (पुरुष):
1. रत्नकुमार बळीराम पंडित
2. सुरेश आबांनी माने
3. मारुती डी. बनकर
प्रथम क्रमांक (महिला):
1. हिरा शेळके
2. सुरेखा संजू वाडे
3. योगिता आयरकर
उत्तेजनार्थ:
1. अनिल बाबाजी कणघरे (पेन, रायगड)
2. पांडुरंग महादेव पाके (उरण, रायगड)
या कार्यक्रमाला चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी महापौर सुधाकर सोनवणे (नवी मुंबई महानगरपालिका), जीएसटी उपायुक्त विनोद देसाई, समाजसेवक अंकुश सोनवणे (नवी मुंबई), मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले, एडिशनल कलेक्टर संदीप कळंबे (मुंबई), माजी शिक्षणाधिकारी मा. श्री. रामदास बिडवे (नवी मुंबई) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष डी. एल. भादवणकर, कार्याध्यक्ष विशाल पाटील, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील तसेचमारुती आर्दाळकर, नामदेव कुंभार, अभिजीत पुजारी, मनोहर पाटील, अर्जुन पाटील, उत्तम भादवणकर, तानाजी मिसाळ, मारुती हातकर, सुहास शिंदे, धनाजी जाधव, संदीप पाटील, मारुती हिरुगडे आणि महिला सदस्यांमध्ये सुषमा भादवणकर, दमयंती पाटील, श्रुती सुतार, शोभा भादवणकर, मनीषा यमगर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सदस्य व पदाधिकारी यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.