कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील न्यू इंग्लिश स्कूल व जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोज यांच्या मर्दानी खेळाच्या आखाडयाचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे,प स सदस्या निर्मला माळी, संयोजक वर्षा कुंडले,नरेंद्र कुंडले,ग्रा प सदस्य अनिकेत चौगुले,संभाजी मिसाळ, पोलीस पाटील महंमद पठाण,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुरेश गायकवाड विनायक पोतदार,मुख्याध्यापक एम ए कुरणे,शिवसेना उबाठा अध्यक्ष दीपक कोळी,शिवसेना शिंदे गट अध्यक्ष निवास माने यांसह सर्व पत्रकार,विद्यार्थी-विद्यार्थीनी,पालक,शिक्षक-शिक्षिका मोठय़ा संख्येने उपस्थित होते.