कोल्हापूर : कागल शहरातील शाहूनगर येथील अशोक रावण यांनी कागलचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर दैवाला हसन मुश्रीफ हे “सहाव्यांदा आमदार व्हावे” असा नवस केला होता. आ तो नवस पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात गहिनीनाथांचे दर्शन घेऊन मुश्रीफ यांच्या हस्ते मानाचा गलेफ अर्पण करून विधिवत पूजा केली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, पक्षप्रतोद नितीन दिंडे, भिकाजी देवकर, संतोष रजपूत, इम्तियाज नंदगावे, सचिन साऊळ, दिलीप पाटील, विनोद वाघेला यांच्यासह शाहूनगर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.