कोल्हापूर : सेनापती कापशी (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल व कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदार संघाच्या नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
यावेळी शेतकरी संघाचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सरपंच उज्वला कांबळे, उपसरपंच सौरभ नाईक, विना नाईक, प्रदीप चव्हाण, अंकुश पाटील, प्रवीण नाईकवाडे, तानाजी पाटील, बाबासाहेब सांगले, रामभाऊ सांगले, शामराव पाटील, ज्योती मुसळे, सूर्याजीराव घोरपडे, सुनील चौगुले, ॲड. अरुण पाटील, सोनूसिंह घाटगे, सुभाष गडकरी, एकनाथ नार्वेकर, एकनाथ कमते, संतोष बरकाळे, अरुण नाईक, विद्याधर तेलवेकर, विजय काळे, विशाल कुंभार, दिलीप शिंदे व मान्यवर उपस्थित होते.