पंचगंगा साखर कारखाना चेअरमन पी एम पाटील यांचा सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे)
इचलकरंजी पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर मा. पी. एम. पाटील आणि प्रमोद पाटील यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री मा. डी. सी. पाटील, अभिनंदन पतसंस्था कुंभोजचे चेअरमन अशोक पाटील, बाबासाहेब पाटील (कुंभोज ) आणि अभिषेक पाटील अशी मान्यवरांच्या वतीने इचलकरंजी येथे करण्यात आला.

 

 

यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासदाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत निर्णय घेतले असून, सदर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्व सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा सार्थकी लागला असे मत पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पी एम पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे संचालक व सभासद उपस्थित होते.