मंत्री आबिटकरांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना इ. योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान कार्यक्रम मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

 

सरकारच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे मी माझं कर्तव्य समजतो. सदर योजनांमुळे लाभार्थ्यांना निश्चितच मोठा लाभ मिळेल व त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुकर व सोपे होईल.असे मत आबीटकरांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, माजी उपसभापती बाबा नांदेकर, सुर्याजीराव देसाई, तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, समिती अध्यक्ष विक्रम पाटील, अंकुशबापु चव्हाण, सदस्य श्रीधर भोईटे, सदस्या स्मिमा चौगले, युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट, प्रविण नलवडे, माजी उपसरपंच अरुणराव शिंदे, पांडूरंग कांबळे, के.पी.जाधव, तेली, मोरस्कर सर, खानापूर सरपंच शोभाताई गुरव यांच्यासह प्रमुख मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 9921334545