कोल्हापूर : शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या ठिकाणी ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहील आणि नव्या अत्याधुनिक इमारती मधून ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार अधिक गतिमान होण्यास मदत होईल याचा विश्वास शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच बाजीराव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, महादेव सुतार, विजय जाधव, श्रीकांत कांबळे, मनिषा संकपाळ, कमल कौदाडे, महमद महात, वसिफा पटेल,कोमल समुद्रे, अनिता शिंदे, हर्षदा यादव, अरिफ सर्जखान, धनश्री खवरे, नाजिया देसाई, अविनाश कोळी, दिलीप पाटील, अनिल शिरोळे, उदय पाटील, सतिश पाटील, दिपक यादव, संपत संकपाळ, शिवाजी समुद्रे, सुभाष पाटील, सलिम महात, राजेश पाटील, बबन संकपाळ, ग्रामविकास अधिकारी गिता कोळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.