कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 61 सुभाष नगर येथे भाजपा कोल्हापूर व भागीरथी महिला संस्था यांच्या वतीने महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांना मार्गदर्शन केले.


आज महिला भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देत आहेत. एक महिला सशक्त झाली तर संपूर्ण परिवार सशक्त होतो. महिलांच्या हाती पैसे आले तर त्याचे सुनियोजन होते, ते वाया जात नाहीत. म्हणून विकसित भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू करावेत. यासाठी भागीरथी महिला संस्था सदैव आपल्याला पाठबळ देईल असे मत सौ. अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशिक्षिका मा. अश्विनी वास्कर यांनी महिलांना सेंट, रूम फ्रेशनर, फिनेल, नीळ, वॉशिंग पावडर, अगरबत्ती, केक, बेकरीचे विविध पदार्थ, चौपाटीवरील खाद्यपदार्थ याबद्दलचे सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामध्ये मदुराई महिला बचत गट, अंबाई ग्रुप, इंद्रायणी महिला बचत गट, स्वामिनी महिला बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी मनीषा कुलकर्णी, मानसी ठाकूर, सुनिता सोनवणे,शुभांगी देसाई, अश्विनी कामत, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
