सावित्रीबाई फुले जयंती शिवतेज संघटनेच्या जिल्हा कार्यालयात साजरी

कोल्हापूर :प्रतिनिधी 
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष हरूनभाई शेख आणि राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

 

सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्रियांना शिक्षण व अधिकार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.

कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी गिरी गोसावी, उपजिल्हा अध्यक्ष संतोष तोडकर, अरविंद टेळे पाटील, सचिव दिलीप कोळी, कार्यालय प्रमुख सुनील कांबळे, पत्रकार प्रदीप जाधव, महिला जिल्हा अध्यक्ष कविता कोंडेकर, महिला उपजिल्हा अध्यक्ष मीनाक्षी सोगरसाने, महिला शहर अध्यक्ष रेखा माने, जिल्हासदस्या इंदुबाई साळे यांसह अनेक महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महत्ता स्पष्ट करताना समाजात महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे महिलांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्धार केला.

🤙 8080365706