कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके हे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहिले .
या संघामार्फत दरवर्षी गुणवंत पत्रकारांना तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संघाच्या या स्तुत्य उपक्रमास आज उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी कृषि राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि सर्जेराव पाटील ( मा. जि. प . कोल्हापूर उपाध्यक्ष) मा पी.व्ही . पाटील (संस्थापक पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ) , प्रा.एस. पी चोगुले(करवीर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष), सुभाष सर्जेराव पाटील (सरपंच ग्रामपंचायत कळे/खेरीवडे) तसेच सर्व पत्रकार बंधु आणि नागरिक उपस्थित होते