बार असोसिएशनच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कोल्हापूर : जिल्हा बार असोसिएशन तर्फे शाहू सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे अवचित्य साधून नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोल्हापूर येथील सर्व न्यायाधीश व वकील वर्ग यांच्यामध्ये बेंच आणि बार नाते मृदंगत व्हावे याकरिता नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

 

प्रतिमेस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवालसो यांनी पुष्पहार अर्पण करून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन चे सभासदांकरिता प्रतीकात्मक अध्यक्ष श्री सर्जेराव खोत यांना पुष्पगुच्छ देऊन न्यायालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या. प्रतिकात्मक अस्वागत बार असोसिएशनचे सेक्रेटरी निशिकांत पाटोळे यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्तावना अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी केली.

असोसिएशनच्या न्यायालयांमध्ये जुनी कामे प्रचंड प्रलंबित आहेत त्याकरिता सर्व वकीलवर्गांनी व न्यायाधीशांनी लवकरात लवकर कामांचा निपटारा होण्याकरिता सहकार्य करावे व न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करावा यासाठी आव्हान केले त्यास सभेमध्ये उत्तम प्रतिसाद देण्यात आला व नवीन वर्षामध्ये जास्तीत जास्त जुने खटले निकाली काढण्यात येतील व त्यासाठी वकील वर्ग सर्वतोपरी प्रयत्न करतील असे आश्वासित करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारिणी सदस्य श्री सागर घोरपडे यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी.पी.सय्यद तसेच जिल्हा सरकारी वकील माननीय विवेक शुक्ल, संचालक सरिता घोरपडे, गीता इंगळे, पृथ्वीराज करपे , माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, गिरीश खडके, प्रशांत शिंदे, तसेच एडवोकेट राजेंद्र मंडलिक, सुनील गावडे, पी आर भावके, नारायण भांदिगरे, धनश्री चव्हाण, कल्पना माने इत्यादी सभासद उपस्थित होते.

🤙 9921334545