कुंभोज (विनोद शिंगे)
हुपरी (ता.हातकणंगले) येथील 94 ग्रुप च्या वतीने स्वर्गीय आदिनाथ पाटील यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीर जिव्हेश्वर भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी आमदार अशोक माने यांचे हस्ते रक्तदात्यांना भेट वस्तू व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी पुरुषांच्या बरोबर महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे जेष्ठ नेते दिनकर ससे,माजी नगरसेवक सुभाष कागले,नेताजी निकम,रवींद्र चिटणीस, उदय पाटील,युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव,सुहास जाधव,प्रकाश मुधाळे संजय निकम*,हणमंत आपटे,भाऊसो गायकवाड,बाळासो मुधाळे,उदय शिंदे,शमशूद्दीन सनदी,तेजस कांबळे,विजय सुतार,रामदास म्हेतर, धनाजीधायगुडे,राजेंद्रपाटील,विजयकुमार पाटील यांसह रक्तदाते व 94 ग्रुप चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.