कोल्हापूर : महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित कामगार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अभिनेते भरत दैनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलापूर ही कोल्हापूरची ओळख ठळक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही याप्रसंगी उपस्थितांना दिली. कोल्हापुरातील चित्रनगरीच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी आणण्याचा मानस आहे. तसेच शाहू स्मारक भवनच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी केली.
कलाकार आणि प्रेक्षकांना दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला.