मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग व गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणा आला. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडची तब्येत दोन दिवसापासून बिघडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कराड याला रात्री मार्क लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वाल्मीक कराडला पहिल्या दिवशी थोडावेळ ऑक्सिजन मास्क लावण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन मास्क लावला. कराड याला दररोज गोळ्या सुरू आहेत. सीआयडीकडे आत्मसमर्पण होत असताना त्यांनी सोबत औषध आणले आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे.
वाल्मिक कराड ने पहिल्या दिवशी कोठडीतील जेवण घ्यायला नकार दिला, दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ताला नकार दिला. कराड याला शुगर आणि बीपी चा त्रास आहे त्याला खाण्यासाठी आग्रह केला त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास जेवण केले.दोन्ही रात्री तो ऑक्सिजन मास्क लावून झोपला होता अशी माहिती समोर आली आहे.