कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगरला निधी मंजूर

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वपूर्ण निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

कापडे गल्ली येथील महेश मोरे यांच्या घरापासून हनुमान तालीम अतिग्रे यांच्या घरापर्यंत गटार निर्मितीसाठी २५ कोटींच्या निधीतून १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. याचप्रमाणे माळी गल्लीमध्ये हॉटेल श्री. येथून माळी यांच्या घरापर्यंत व हॉटेल हेवन ते प्रबोधन क्लासपर्यंत गटार निर्मितीसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विकास कामांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये अजित मोरे, मोहन जाधव, अक्षय शिंदे, बाळासाहेब मुधळकर आणि प्रणित व्हनाळकर या मान्यवरांनी आपला विशेष सहभाग नोंदवला.

🤙 8080365706