चंद्रकांतदादा पाटील यांचे रविवारी होणार कोल्हापुरात स्वागत

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री झालेनंतर पहिल्यांदाच रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापूर रेल्वेस्टेशन याठिकाणी सकाळी ६ वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दादांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. 

 

रेल्वे स्टेशन येथील स्वागतानंतर दिवसभरातील नियोजित दौऱ्यानंतर नामदार चंद्रकांतदादा पाटील हे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क याठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

🤙 9921334545