कोल्हापूर ( सोमनाथ जांभळे )
करवीर निवासिनी अंबाबाईची मार्गशीष शेवटचा गुरुवारनिमित्त ‘जगतजननी; रूपात पूजा मांडण्यात आली .
देवीचे नवरात्र वर्षातून चार वेळा असते ते असे; चैत्र, आषाढ, आश्विन आणि माघ. चैत्र आणि आश्विनातील नवरात्रविधान हे प्रगट असते तर आषाढ आणि माघमधील नवरात्रविधान हे गुप्त मानले जाते. सहसा शाक्त तंत्रात दीक्षित व्यक्तींसाठी गुप्त नवरात्रविधाने सांगितली आहेत. पण तंत्रात दीक्षित नसलेल्या व्यक्तीदेखील ही गुप्त नवरात्रविधाने पाळु शकतात.
फरक इतकाच असतो की, असे लोक पारंपारिक आणि प्रगट पद्धतीने, जसे, चंडीपाठ, पूजा, उपवास यांच्या माध्यमातून, जगदंबेची उपासना करतात तर शाक्त तांत्रिक व्यक्ती दशमहाविद्या जसे, काली, तारा, वाल्गामुखी, श्रीविद्या, कमला, छिन्नमुंडा, तसेच दुर्गा इ. यांची उपासना मंत्र-तंत्र-यंत्र यांच्या माध्यमातून करतात. पारंपारिक पद्धतीने गुप्तता पाळून ही विधाने करायची असल्याने माघ आणि आषाढ नवरात्रींना गुप्तनवरात्र असे नाव पडले.
ही पूजा पुजारी मयूर मुनेश्वर,शरद मुनेश्वर,रवी माईनकर, प्रसाद लाटकर यांनी मांडली.