मुंबई : कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळवुन देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये निघणाऱ्या मोर्चात छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार आहेत, या मोर्चात तुम्ही देखील सहभागी व्हावे.असे आवाहन केले आहे.
संभाजीराजे म्हणाले, दि. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये आयोजित मोर्चामध्ये मी सहभागी होत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपी वाल्मिक कराड व इतर दोषींना तात्काळ अटक करावी, ही माझी ठाम मागणी आहे.मी पहिल्याच दिवशी भूमिका घेतली होती की, धनंजय मुंडे यांचे आरोपींशी जवळचे संबंध असल्यामुळे प्रशासनावर दबाव येऊ शकतो. नंतर मुंडे यांनी स्वतःच आरोपी वाल्मिक कराडसोबतचे संबंध मान्य केले आणि त्यांची बाजू उघडपणे घेतल्याने हा दबाव स्पष्ट झाला.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचे कर्तव्य सरकारचे आहे, परंतु जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे दुर्दैवी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी देशमुख कुटुंबीयांसोबत ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.