कोल्हापूर : श्री रेणुका मातेचा रथ कोल्हापूर जिल्ह्यातून 20 ते 29 डिसेंबर दरम्यान 73 गावांमधून फिरणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने धर्म जागरणाचे काम सुरू आहे. ही चळवळ 1996 पासून सुरू झाली आहे. अनेक हिंदू धर्मातील लोक परिवर्तित होत आहेत. हे थांबले पाहिजे हा या चळवळीचा उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जे लोक आपल्या धर्मापासून बाजूला गेले आहेत त्यांनी पुन्हा आपल्या धर्मात यावे. त्यांचे आम्ही स्वागत करतो. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी समाजातील अनेक लोक या चळवळीला पाठिंबा देत आहेत. तरी सर्व बांधवांनी आपल्या मूळ धर्म प्रवाहात राहून धर्म जागरण करूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
या अनुषंगाने महाडिक हे किणी येथे उपस्थित राहून रेणुका मातेच्या रथाचे पूजन करून दर्शन घेतले व पुढील रथोत्सवास शुभेच्छा दिल्या.