कोल्हापूर : काळाबागदेव विकास सेवा संस्था मर्यादित बेलवळे बुद्रुक या संस्थेचा नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी जि प सदस्य मनोजभाऊ फराकटे, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, सहाय्यक निबंधक समीर जांबोटकर, नारायण पाटील, विलास पाटील, पांडुरंग पाटील, सतीश पाटील, रंगराव सावेकर, केंबळीचे सरपंच विकास पाटील, यांच्यासह संस्थेचे संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.